सोलापूर: 'आर्ट ऑफ लिव्हिंग' चे संस्थापक गुरुदेव प. पु. श्री श्री रविशंकर यांच्या वतीने कुमठे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने व स्वाती माने यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक देव गोसकी व गोरख डांगे यांनी या शिबिराचे मार्गदर्शन केले.
या शिबिरात त्यांनी विविध प्रकारची प्राणायाम व योगासने यांचा मानवी शरीरासाठी होणारा फायदा यांचे महत्त्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवणे यासाठी योगाचे अत्यंत महत्त्व आहे, तसेच मनातील व शरीरातील सकारात्मक बदल यासाठी योग व प्राणायाम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, असेही उभयतांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी विद्यार्थ्याकडून विविध प्रकारचे योग व प्राणायाम करून घेतले.
हे योग शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.संजय जाधव, प्रा. दादाराव डांगे, प्रा.हनुमंत शिंदे, प्रा. दीपक शिंदे, प्रा. विजयकुमार वाळके, प्रा. विनोद थोरात, प्रा.राजीव निकम व प्रा. बंडोपंत बाबर यांनी परिश्रम घेतले.