स्वराज सप्ताहनिमित्त आयोजित निबंध लेखन तसेच रांगोळी स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद

shivrajya patra

सोलापूर : हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वराज सप्ताहनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी शिव विचारांवर आधारित निबंध लेखन तसेच रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वराज सप्ताह अंतर्गत प्रज्ञासागर गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज सप्ताह साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राजश्री शाहू मराठी विद्यालयात शिव विचारांवर आधारित निबंध लेखन स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.

सुरुवातीला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन स्थायी समिती माजी सभापती आनंद मुस्तारे व जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विचारपीठावरील मान्यवरांचा सत्कार सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला.

यावेळी विचारपीठावर शहर–जिल्हाध्यक्ष संतोष पवार, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, अर्चना दुलंगे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, त्याचसोबत शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रज्ञासागर गायकवाड यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. खाऊ वाटप  कार्यक्रमाची सांगता झाली.

To Top