रामचंद्र शिंदे यांचं निधन !

shivrajya patra

सोलापूर : येथील दमाणी नगर भागातील ज्येष्ठ सदस्य रामचंद्र आनंदा शिंदे यांचं शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते मृत्यूसमयी ८० वर्षीय होते.

त्यांच्या पार्थिवावर दुपारी १ वाजता कोयना नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात ३ मुले आणि १ मुलगी असा परिवार आहे. ते राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे सरचिटणीस विठ्ठल शिंदे यांचे वडील तर पत्रकार सूर्यकांत आसबे यांचे सासरे होत.


To Top