सोलापूर : नेहमीच्या गुप्त ठिकाणी लपवून ठेवलेल्या चावीने अज्ञात चोरट्यानं कुलुप उघडल्यावर घरात प्रवेश करुन, दीड लाख रूपयांची रोकड आणि बाजारभावाप्रमाणं सुमारे तीन लाख रूपयांचे सोन्याचे असा ०४.५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. ही घटना रविवारी दुपारी केशवनगरात घडलीय.
मौलाली चौक परिसरातील केशवनगरातील रहिवाशी शहेबाज शौकत पठाण यांनी, दुपारी स्वतःचं घर बंद करून बाहेर जाण्यापूर्वी नेहमी प्रमाणे शुजमध्ये चावी ठेवली होती. अज्ञात चोरट्यानं गुप्त ठेवलेल्या चावीनं घर उघडून घरातील बेडरुमधील कपाटातील १,५०,००० रुपयांची रोख रक्कम, १,२०,००० रुपयांचे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन, ८०,००० रुपयांची सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील चैन, ५६,००० रुपयांची सुमारे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी आणि ४०,००० सुमारे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याची अंगठी असा एकूण ४, ४६, ००० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द भा. न्या. संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक शिंदे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
