सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकारांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला सम्मान मिळावा, या दृष्टीकोनातून विभागीय हातमाग कापड स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर यांचे अधिपत्याखाली सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्राथमिक हातमाग विणकर सहकारी संस्था/स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरासाठी हातमाग कापड स्पर्धा दिनांक 4 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ, अक्कलकोट रोड एम. आय. डी. सी. सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
विभागीय हातमाग कापड स्पर्धेकरीता पारंपारीक (साड्या, लुगडी, लुंगी, खणावळी, धोतरे इत्यादी) व अपारंपारीक (टॉवेल, चादरी, शर्टीग, कोटींग पडद्याचे कापड, मफलर, शॉल, वॉल हॅगींग इत्यादी) वाणाचे हातमाग विणकरांनी त्यांनी हातमागावर उत्पादन केलेले कलात्मक व नाविण्यपुर्ण वाण दिनांक 03 मार्च 2025 पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर, सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पत संस्था इमारत, जुने जिल्हाधिकारी आवार, सोलापूर येथे स्विकारण्यात येतील.
या विभागीय हातमाग स्पर्धेकरीता हातमाग सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता गट व खाजगी क्षेत्रातील हातमाग विणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग उज्वला पळसकर यांनी केलं आहे.
.jpeg)