छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन केली स्वराज्याची निर्मिती : सुधीर खरटमल

shivrajya patra

शिवजन्मोत्सवानिमित्त अठरा पगड जातीतील शिवभक्तांचा सन्मान सोहळा

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. त्यांचा आदर्श प्रत्येक समाजातील लोकांनी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोलापूर शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केले.

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूर शहरातील अठरापगड जातीमधील शिवभक्तांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शहरातील अठरा पगड जातीतील शिवभक्तांचा सन्मान चिन्ह, शाल, फेटा, घालून सन्मान करण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गेल्या साठ वर्षात जातीविरहित राजकारण केले. महाराष्ट्रातील प्रत्येक जाती-धर्माला घेऊन विकासाचं राजकारण पवार यांनी केले.

आताचं जातीभेदाचे राजकारण थांबावं आणि महाराजांचा आदर्श सर्वांसमोर पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी महापौर नलिनी चंदेले, प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, सिकंदर गोलंदाज, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, सर्फराज शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना सुधीर खरटमल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श सर्वांनी घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले. महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. मी कधीच जातीभेद केला नाही. आताच्या या जातिभेदाचे राजकारण करण्याच्या काळात सर्वांनी महाराजांचा आदर्श घेऊन जातीविरहित समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन सुधीर खरटमल यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते ब्रिजमोहन फोफलिया यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शंकर पाटील, नलिनी चंदेले, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास सूर्यकांत शेरखाने, सिद्धारूढ निंबाळे, सिया मुलानी, वसीम खान मॅडम, जावेद शिकलगर, अमित मोतेवार, रामप्रसाद शागलोलू, सुनिता दळवी, मल्हार शिंदे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

**चौकट**

... यांचा झाला सन्मान !

ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, राजशेखर हिरेहब्बू, हाजी मतीन बागवान, पत्रकार इक्बाल शेख, सुशील बंदपट्टे, इंद्रमल जैन, रोहित तडवळकर,  शिवाजी भोसले, अॅड. कृष्णा मुकारे, अभिषेक चराटे, ज्ञानेश्वर मोटे, प्रा. अनिल लोंढे, बसवराज सावळगी, प्रा. शंकर खळसोडे, आशिष परदेशी, विशाल वेर्णेकर, महेश कुंभार, मल्लू कोळी, लहू बंदपट्टे , अमोल पवार, शामसुंदर आडम, प्रदीप सुरवसे, अजय सरवळे आदींचा सन्मान करण्यात आला.

To Top