सोलापूर : केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लॅस्टिकच्या वापरास, प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज निर्मितीस व वापरास मान्यता नाही, राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेत, राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करणे आवश्यक असते. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, त्याची विटंबना होणे हे बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतूदीनुसार दंडनीय आहे.
कोणतेही खराब ध्वज आढळून आल्यास ते सन्मानपूर्वक गोळा करून नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा करावेत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जनतेस भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.