आपलं संविधान आणि लोकशाही विचाराचं संवर्धन करण्यासाठी करावा दृढसंकल्प : संतोष पवार

shivrajya patra

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचं ध्वजारोहण

सोलापूर : आपलं संविधान, लोकशाही, सर्वधर्मसमभावाच्या विचाराचं संरक्षण, संवर्धन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दृढसंकल्प करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक अमृत महोत्सवी वर्धापन दिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या शुभहस्ते रविवारी, २६ जानेवारी रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवादलाचे सिकंदर गोलंदाज, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शन आणि सूत्रसंचालनात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

देशाचं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाचं संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची आहूती देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्याचं सामर्थ्य केवळ आपल्या संविधानात, लोकशाही व्यवस्थेत आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांमध्ये आहे, असंही जिल्हाध्यक्ष पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले. 

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, प्रदेश सचिव शशिकांत कांबळे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ॲडवोकेट सलीम नदाफ, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, आमिर शेख, तनवीर गुलजार, बसवराज कोळी, आशुतोष नाटकर, अल्मेराज आबादीराजे, मार्तंड शिंगारे, इस्माईल शेख, समदानी मत्तेखाने, अहमद बागवान, इरफान शेख, अहमद मसुलदार, रमीज कारभारी भारत नागटिळक, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, संजय सांगळे, अनिल छत्रबंध, तुषार शामराव गांगर्डे, राहुल सामल, ओंकार हजारे, महेश कुलकर्णी, मौलाली शेख, शंकर पुजारी, दत्ता बनसोडे, मनोज शेरला, प्रदीप बाळशंकर, प्रज्ञासागर गायकवाड, रुपेश भोसले, अमोल कोठीवाले, मल्लिनाथ इटकळे, जयराज सांगे, भीमराज मटके, प्रकाश मोटे, कांचन पवार, प्राजक्ता बागल, अर्चना दुलंगे, सुरेखा घाडगे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top