मुस्लिम बांधवांच्यावतीने मानकरी आणि मानाच्या सात काठ्यांवर पुष्पवृष्टी

shivrajya patra

सोलापूर : मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही विजापूर वेस येथील चौकात मानकरी आणि मानाच्या सात काठ्या आणि पालखीवर पुष्पवृष्टी करत आपली दरवर्षीची परंपरा जपली. हिंदू-मुस्लिम एकता टिकावी, जातीय तेढ वाढू नये, समतेचा संदेश जावा, यासाठी दरवर्षी मराठा सेवा संघ प्रणित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. 

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज त्यांची यात्रा सध्या सुरू असून आज 68 लिंगाच्या तेलाभिषेकसाठी मानाचे साथही नंदीध्वज हिरेहबू वाड्यातून निघाले होते. दरम्यान विजापूर वेस येथून जाताना सातही नंदीध्वजाचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून स्वागत करण्यात आले. 

यावेळी अध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, राजू हुंडेकरी, तन्वीर गुलजार, बशीर सैय्यद, गफुर शेख, लक्ष्मण भोसले, सादिक मुजावर, अनिल उकरंडे, मुख्तार लालकोट, रियाज पैलवान, सरफराज शेख, मौला शेख आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अन्य मावळे उपस्थित होते.

To Top