Type Here to Get Search Results !

रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने हेल्मेट रॅली संपन्न

सोलापूर : राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांच्या निर्देशानुसार व प्रमुख  अध्यक्ष जिल्हा निधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी,  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर पोलीस वाहतुक शाखा व वकील संघ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये शिरस्त्राण फेरी (हेल्मेट रॅली) संपन्न झाली.

ही रॅली जिल्हा न्यायालयाकडून सकाळी 9.30 वा. रवाना करण्यात आली. रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हेल्मेट रॅलीचा शुभारंभ जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी विजय पाटील व सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष अमित आळंगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

याप्रसंगी पोलिस उप आयुक्त अजित बोऱ्हाडे, जिल्हा न्यायाधीश आर. जे. कटारीया, जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंह राजपूत, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश उमेश देवर्षी यांनी केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी रस्ता सुरक्षा बाबत यावेळी माहिती दिली, तसेच पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी प्रत्येक नागरिकांना वाहन चालवताना हेल्मेट घालावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी रस्ते वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याबाबत जनतेला आवाहन केले.

ही रॅली जिल्हा न्यायालय येथून सुरु होऊन रंगभवन चौक-डफरिन चौक-रेल्वे स्टेशन-मोदी पोलिस चौकी- सातरस्ता-गांधीनगर-गुरुनानक चौक-अशोक चौक पोलीस चौकी-पोलीस मुख्यालय या मार्गाने रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. देवयानी किणगी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी केले.

या कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, विधीज्ञ न्यायालयीन कर्मचारी, प्रादेशिक परिवहनचे मोटार वाहन निरिक्षक विश्वंभर कोकाटे, श्रीमती पल्लवी पांडव, श्रीमती प्रियंका माने, महेशकुमार गावडे, श्रीमती तेजस्वीनी वायचळ, श्रीमती भाग्यश्री रोडगे, सहा मो. व. निरिक्षक कर्मचारी शहर वहातुकचे पोलिस निरीक्षक रविंद्र भंडारे व सुरज मुलाणी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सोलापूरचे कर्मचारी, लोकअभिरक्षक कार्यालयाचे विधिज्ञ, पोलीस कर्मचारी, मोटार रायडर संघटनेचे पवन मोंढे, मोटार ड्रायविंग स्कुलचे प्रफुल्ल् पानगांवकर, पोतदार शाळेचे शिक्षक करण शिंदे सर, पोतदार शाळेचे विद्यार्थी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.