Type Here to Get Search Results !

पोलीस कर्मचाऱ्यांचं १० लाखाचं लाच प्रकरण; सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सोलापूर : पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अर्ज चौकशीवरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी, तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांना गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठी आणि इतर सर्व सहकार्य करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हवालदारासह २ पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलंय. महेश राचप्पा कोळी, (वय-४३ वर्षे, पो.ह/९०५) आणि वैभव रामचंद घायाळ, (वय-३२ वर्षे, पो.शि./६२४) अशी आरोपीतांची नावे असून उभयतांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आलंय.

मंगळवेढा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार महेश राचप्पा कोळी आणि पोलीस शिपाई वैभव रामचंद घायाळ यांनी अर्ज चौकशीवरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपी म्हणून अर्ज चौकशीवरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपी म्हणून तक्रारदाराचे असलेले नाव कमी करण्यासाठी, तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांना गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठी आणि इतर सर्व सहकार्य करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितली. शनिवारी, २५ जानेवारी रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये १०,००,००० रूपये लाचेची रक्कम गुन्ह्यातील रिकव्हरीच्या नावाखाली मागितली असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार रचलेल्या सापळा कारवाईमध्ये आरोपी लोकसेवक पोलीस शिपाई वैभव रामचंद घायाळ यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कमेतील पहिला हप्ता म्हणून ५,००,००० रूपये स्विकारले असता, आरोपी वैभव घायाळ आणि आरोपी क्र. १ महेश राचप्पा कोळी यांना रंगेहाथ पकडण्यात आलंय.

त्या अनुषंगाने आरोपी लोकसेवक महेश राचप्पा कोळी (रा.निंबर्गी कंदलगाव रोड, सिध्दारूढ मठाच्या मागील शेतामध्ये ता. दक्षिण सोलापूर) व आरोपी लोकसेवक वैभव रामचंद घायाळ (रा. गोपाळपूर शिवाजीनगर, सुर्यवंशी किराणा दुकानाजवळ ता. पंढरपूर) यांच्याविरुध्द मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे-खराडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील यांनी पार पाडली.

... नागरिकांना आवाहन ...

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर व मोबाईल नंबर ९५५२५३९८८९ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.

मोबाईल अॅप - www.acbmaharashtra.net

फेसबुक पेज - www.facebook.com-maharashtraACB

वेबसाईट - www.acbmaharashtra.gov.in