सोलापूर : उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या व रेशीम शेतीतून लक्षाधीश झालेल्या शेतकऱ्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी विनित पवार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये 1 हजार 17 शेतकऱ्यांकडे 1 हजार 260 एकरावर रेशीम उद्योग चालू असून त्यापैकी मौजे निमगाव ता.माळशिरस येथील शेतकरी जगन्नाथ पंढरीनाथ मगर यांनी घेतलेली अंडीपुंज संख्या-2 हजार 200, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 1 हजार 760, प्राप्त रक्कम 10 लाख 8 हजार 480 रुपये व जयसिंग साहेबराव मगर यांनी घेतलेली अंडीपुंज संख्या-2 हजार 800, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 2 हजार 110, प्राप्त रक्कम 11 लाख 34 हजार. रुपये, हणमंत तुकाराम सांगोलकर मौजे भंडीशेगाव ता.पंढरपूर यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या-3 हजार 200, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 2 हजार 257 प्राप्त रक्कम 13 लाख 20 हजार 345 रुपये, वैभव भिमराव काळे मौजे कंदर ता. करमाळा, यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या- 3 हजार, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 2 हजार 680 प्राप्त रक्कम 14 लाख 7 हजार 431 रुपय, सौदागर पांडुरंग पांडव मौजे पिरटाकळी, ता. मोहोळयांनी घेतलेले अंडीपुंज संख्या-2 हजार 50, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 1 हजार 701 प्राप्त रक्कम 8 लाख 33 हजार 490 रुपये तसेच श्रीशैल मलकाप्पा नंदगाव मौजे हत्तीकणबस ता. अक्कलकोट यांनी घेतलेले अंडीपुंज संख्या- 1 हजार 50, रेशीम कोषांचे उत्पादन कि.ग्रॅ. 897, प्राप्त रक्कम 4 लाख 72 हजार 560 रुपये इतकी आहे.
सध्या जिल्ह्यातील महारेशीम नोंदणी अभियान चालू असून रेशीम शेतीसाठी तुती लागवड करण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी नांव नोंदणी जिल्हा रेशीम कार्यालय मौजे हिरज (तालुका उत्तर सोलापूर) येथे करावी. तसेच रेशीम उद्योगामधून शेतकऱ्यांनी लक्षाधीत व्हावे. लवकरच सोलापूर जिल्ह्यामध्ये soil to Fabric प्रकल्प राबवीत आहोत. ज्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वत:चा रेशीम कोष विक्री करणे सोईचे होणार आहे व सोलापूर जिल्ह्यातील कुशल विणकरांना कपडा निर्मीतीपर्यंत रोजगार उपलब्ध होईल. ज्यामुळे सोलापूर जिल्ह्याची आर्थिक उन्नती होईल, असे आवाहनही जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी विनित पवार यांनी केले आहे.