माजी महापौर महेश कोठे यांचं निधन

shivrajya patra
सोलापूर : येथील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले माजी महापौर महेश कोठे (वय-६० वर्षे) यांचं प्रयागराज इथं कुंभमेळ्यात स्नान करताना मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 'अण्णा ' या उपनावाने सर्वपरिचीत होते.

सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. स्नान करून बाहेर पडल्यानंतर त्याना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

सोलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश कोठे यांची ओळख होती. गेली ४ दशकं त्यांची शहरावर राजकीय पकड होती. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

2009 ते 2024 या कालावधीत विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहर उत्तर विधानसभा, शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सोलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश कोठे यांची ओळख होती. गेली 40 वर्ष त्याची शहरावर राजकीय पकड होती. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

सोलापूरच्या राजकारणात महेश कोठे यांचा मोठा प्रभाव होता. ते सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते आणि सभागृह नेते म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक वर्षे विविध पक्षांमध्ये काम केले, ज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. त्यांच्या अकाली निधनावर शहराच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपल्याची संवेदना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केलीय.

महेश कोठे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर होते. त्यांचा राजकारणातील अनुभव फारच प्रभावी होता. त्यांच्या नेतृत्वात अनेक नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी महापालिका व राजकारणात आपली छाप सोडली, मात्र आमदार व्हायची त्यांची इच्छा अखेर अपूर्णच राहिली.

महेश कोठे यांनी 2021 मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यानंतर त्यांनी सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घेतली होती, परंतु विजय देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या राजकारणात मोठा शोकसागर पसरला आहे.

महेश कोठे यांचं पार्थिव विशेष विमानाने सोलापुरात आणलं जाणार असल्याचं समजतंय. मुरारजी पेठेतील ‘राधाश्री’ निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

...

एक धडाडीचा कार्यकर्ता गमावल्याची ज्येष्ठ नेते पवार यांनी व्यक्त केल्या भावना

सोलापूरचे सर्वात तरुण माजी महापौर व माझे जुने सहकारी महेश कोठे यांचे प्रयागराज येथे दुःखद निधन झाले. सोलापूर शहराच्या समाजकारणात व राजकारणात महेश कोठे यांचे मोठे प्राबल्य होते. त्यांच्या रूपाने सोलापूर शहराने एक धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. कोठे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली ! या शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी X हँडलवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

To Top