
सोलापुरातील भवानी पेठ, मड्डी वस्ती परिसरातील सुप्रसिद्ध देवस्थान दत्त मंदिरचे पुजारी आनंद हिरेमठ यांच्या शुभहस्ते 'ओला' ईव्ही-बाईक शोरूमचे बुधवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ओला कंपनीचे क्लस्टर मॅनेजर अविनाश कोडपाक बोलत होते.
ओला कंपनीचे क्लस्टर मॅनेजर अविनाश कोडपाक यांनी ओला ईव्ही-बाईकच्या सुविधांसंबंधी बोलताना, प्रारंभी कंपनीने ईव्ही-बाईकचे तीन मॉडेल लाँच केले आहे. ज्यांची प्रारंभिक किंमत ८५ हजार रुपयांपासून सुरुवात होऊन १.५ लाख रुपयांपर्यंत आहे. अन्य ईव्ही-बाईकच्या तुलनेत इतरांहून अधिक बॅटरी आयुष्य देण्यात आलं असून ८०,००० किलोमीटर अथवा ०८ वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी देण्यात आला आहे. तसेच एका चार्जिंगमध्ये १९५ कि.मी. इतकं अंतर कापणार आहे.
ओला ईव्ही-बाईक ने प्रारंभी आलेल्या काही घटना लक्षात त्यात विविध सुधारणा केल्या आहेत. आज ओला ईव्ही-बाईक थिफ प्रुप बाईक म्हणून गणली जाते. कंपनीचे सर्वेसर्वा भावेश अग्रवाल आज देशभरात ४,००० शोरूमचं ऑनलाईन उद्घाटन करीत आहेत. त्यात हेही शोरुम आहे. कंपनी विक्री पश्चात सेवेलाही तितकंच महत्वाचं मानतेय. सेवेच्या तत्परतेत त्या दिवशी आलेली बाईक त्याच दिवशी अखेरपर्यंत ग्राहकाच्या हाती देण्यात येईल, असंही क्लस्टर मॅनेजर अविनाश कोडपाक यांनी म्हटले.
कंपनी ईव्ही-बाईक बरोबरच येत्या काळात तीन चाकी आणि चार चाकी वाहनंही बाजारात आणणार आहे. त्याही ग्राहकांच्या पसंतीला उतरतील, असंही अविनाश कोडपाक यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी एसबीआय इन्फो ऑफिसचे विशाल जेटीथोर, पद्मशाली युवक संघटनेचे माजी अध्यक्ष गोविंद चिंता, सचिनकुमार जाधव, संतोष बनसोडे आणि आदित्य मोरे, दिनेश पाटील, नागेश म्याकल हे कर्मचारीही उपस्थित होते.