सोलापूर : कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि तो चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात. ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत लागते. त्यामुळे चहाच्या कागदी कप वापरावर बंदी घालण्याची सूचना सर्व संबंधीत विभाग प्रमुखाना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं नुकतेच दिले.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अॅड. सतीषचंद्र दि. रोटे पाटील व इतरांनी ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी निवेदन निवेदन देऊन चहा पिण्यासाठी सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या कागदी कपावर बंदी घालण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.
त्या कपात गरम चहा केव्हा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने असंख्य मायक्रो प्लॉस्टिकचे कण गेल्याने नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत लागते, असं त्यात म्हटलंय. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयानं जारी केलेले पत्र, सोशल मिडीयावर सामाईक करण्यात आलंय.
त्या निवेदनासंदर्भात कारवाई करताना, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संजय गांधी योजना तहसीलदार यांनी, ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व विभाग प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात, 'आपल्या अधिनस्त असलेलें सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था ई. कार्यालयांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास व संबंधित अर्जदारास कळविण्यात यावे.' असंही सुचित केलंय.