सोलापूर : आपत्कालीन प्रतिसाद पथक (डायल 112) सोलापूर शहर यांनी माहे नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता, राजकीय सभा, कायदा व सुव्यवस्थेचा महत्वाचा बंदोबस्त, देशाचे प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, इतर Z+ व्यक्ती यांचा महत्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळीवर मात करत आपल्या कामाची तत्परता दाखवून 01 ते 30 नोव्हेंवर 2024 रोजी या कालावधीत एकूण 1707 नागरिकांकडून डायल 112 या हेल्पलाईनवर पोलीस मदत मागितली.
त्यांना पोलीस आयुक्तालयाच्या (डायल 112) पथकाने (DISPATCHER) यांनी कमीत कमी वेळेत सरासरी 00:00:37 सेकंदामध्ये प्रथम प्रतिसाद कर्ता (ERV) पोलीस मदत पाठवून कार्यतत्परता दाखवलीय. यामुळे महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, महाराष्ट राज्य (डायल 112) यांचे माहे नोव्हेंबर 2024 मध्ये सोलापूर शहर येथील प्रेषक DISPATCHER हे महाराष्ट्रात 01 (प्रथम) क्रमांकावर आलंय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी (डायल 112) खुबा चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीमती योगिता सुरेश कुदळे, ग्रे. पोसई अरुण फडके, ASI काळे, पो.हे.कॉ. किरणकुमार गायकवाड, पो.हे.कॉ नितीन घाटे, पो.हे.कॉ सादिक शेख, पो.हे.कॉ लक्ष्मीकांत निरंजन, पो.हे.कॉ. सुरज तिवारी, पो.हे.कॉ. युसुफ काझी, म.पो.हे.कॉ. शैलजा बोराडे, म.पो.हे.कॉ. वर्षा चव्हाण, पो.हे.कॉ. मल्लेशी घोडके, पो.हे.कॉ. गणेश जाधव, पो.कॉ.अमर शेळके, पो.कॉ. सचिन कुलकर्णी, पो. कॉ. दिनेश वाघमोडे व MERS चे इंजिनियर सुफीयान सय्यद, सिद्धार्थ माढेकर यांनी केली.