सोलापूर : बी. एल. डी. आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या सन 2024-25 या वर्षात डॉ. वैष्णवी गणेशकर यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम श्रेणी मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या मेडिकल कॉलेजमध्ये पदवी प्रदान समारंभ आयोजित केला होता. या सोहळ्यात डॉ. वैष्णवी गणेशकर कर्नाटकात सन्मानित करण्यात आले. या उज्ज्वल यशाने सोलापूरची मान उंचावलीय.
सन 2024-25 या वर्षात मूळतः सोलापूरच्या डॉ. वैष्णवी यांनी बी. एल. डी. आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये फस्ट रॅक मध्ये येऊन प्रथम क्रमांक पटकावला. या मेडिकल कॉलेजमध्ये पदवी प्रदान समारंभ आयोजित केला होता. पदवीप्रदान झाल्यानंतर उमा रेड्डी यांच्याकडून पंचवीस हजार रुपये रोख व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. वैष्णवी यांनी शल्य चिकित्सक या विषयात प्रथम क्रमांक मिळविला, म्हणून रोख पाच हजार रुपयांचं रोख पारितोषिक डॉ. वैष्णवींना प्रदान करण्यात आलं. डॉ. अश्विनी यांच्याकडून ही पाच हजार रुपयेचे चरक संहिता हे पुस्तक देऊन डॉ. वैष्णवी यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील एक विद्यार्थीनीनं कर्नाटकात जाऊन यशाचं शिखर सर केल्याने त्यांचं कौतुक करण्यात आलं, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी बी.एल.डी. आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संजय कडल्लीमठ्ठी व बी.एल.डी. आयुर्वेद महाविद्यालयचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थी, डॉक्टरांना पदवीप्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित डॉक्टरांना शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमात डॉ. वैष्णवी गणेशकर यांच्या पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते.