Type Here to Get Search Results !

बीट मार्शल जखमी; पुणे महामार्गावरील दुर्घटना

सोलापूर : भरधाव दुचाकीची जोरदार धडक लागून झालेल्या अपघात कर्तव्य बजावत असलेले बीट मार्शल पो. कॉ. स्वप्नील संजय मोरे (वय-३५ वर्षे) जबर जखमी झाले. ही दुर्घटना सोलापूर-पुणे हायवेलगत राजमुद्रा हॉटेलसमोर बाळे-केगांव सर्व्हिस रोडवर शनिवारी सायंकाळी ०७ वा. च्या सुमारास घडलीय. या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वाराविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल मोरे (ब.नं.१५४१ रा- २५८/३६/अ गवई पेठ, जुना बोरामणी,नाका, रविवार पेठ, सोलापूर.) हद्दीत बाळे बिट मार्शल असे कर्तव्य करण्यासाठी सरकारी मोटार सायकल, जिचा क्र. एमएच १३ डब्ल्यू एफ २२७९ वर नेमले होते. 

ते कर्तव्यावर असताना बाळे हद्दीत पेट्रोलिंग करीत ते १९.०० वा. च्या सुमारास पुणे हायवेलगत राजमुद्रा हॉटेलसमोर आले असता, एमएच १३ ई एच १८५६ या मोटार सायकलचा चालकाने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल हयगयीने निष्काळजीपणे जोरात वेगाने चालवून पो.कॉ. मोरे यांच्या मोटार सायकलीस समोरून धडक दिलीय.

त्यात पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांच्या डोकीस, दोन्ही पायास, हातास, ओठाला, गालास, छातीस गंभीर दुखापत झालीय. या दुर्घटनेत अपघातास कारणीभूत ठरलेला दुचाकीस्वार ही स्वतः देखील जखमी झालाय. पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.