Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत निधीतून दिव्यांगाचं घर प्रकाशमय; महामानवास अनोखी आदरांजली

मंद्रुप : बाबासाहेबांचा जन्म आणि महानिर्वाणही आम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवतो. भारतरत्न डॉ. आंबेडकर आपल्यासाठी प्रकाशवाटा दाखवणारे महामानव अजरामर आहेत, ग्रामपंचायतीच्या दिव्यांग निधीतून नविन विज जोडणी देऊन महामानवास अनोखी आदरांजली अर्पण करण्याची संधी आम्हासाठी प्रकाशाचा संदेश देणारा क्षण असल्याचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी सांगितले.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी टाकळी येथील दिव्यांग दांम्पत्य बाबुराव साबळे व रेखा साबळे यांना टाकळी ग्रामपंचायतीच्या दिव्यांग निधीतून नविन विज जोडणी देऊन ते घर प्रकाशमय करून महामानवास अनोखी आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी टाकळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी, माजी सदस्य रेवप्पा साबळे, दिलीप साबळे, अविनाश शिवशरण, बाबुराव साबळे, गुंडाराज भोई, प्रकाश साबळे, भानुदास गायकवाड, सिद्धार्थ बाणीकोल, नंदाबाई गायकवाड, रेखा साबळे उपस्थित होते.