Type Here to Get Search Results !

अजित कुलकर्णी तडीपार

सोलापूर : प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित प्रभाकर कुलकर्णी (वय-४८ वर्षे) यांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. त्यांच्याविरुध्द साथीदारांसह खंडणी मागणे, दंगा व मारामारी करणे, सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

अजित कुलकर्णी यांच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. त्यास परिमंडळ कार्यालयानं मंजूरी दिलीय.

पोलीस आयुक्तालयानं अजित प्रभाकर कुलकर्णी (रा. विजय देशमुख नगर, विजापूर नाका, सोलापूर) यांना सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केलंय. त्यांना  तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलंय.