Type Here to Get Search Results !

' अभिनव ' च्या वैभवीने वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

धाराशिव : श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळ, सोलापूर संचलित श्री स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळा धाराशिव येथे कुमारी वैभवी विद्यानंद साखरे हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

धाराशिव येथील अभिनव इंग्लिश मेडियम स्कूल येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कु. वैभवीने तिच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना वह्या पेन व इतर शैक्षणिक साहित्य, फळे व उबदार कानटोपीचे वाटप केले. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

माझ्या आयुष्यातील हा सर्वात चांगला वाढदिवस असून दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर माझी मैत्री झाली असल्याचे आपल्या मनोगतातून वैभवी हिने सांगितले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यीनी नंदीनी घोगरे आणि फातिमा शेख यांनी हाताने विणलेले मोबाईल कव्हर कम पर्स वैभवीस भेट दिली.

यावेळी वैभवीचे वडील विद्यानंद साखरे, सुवर्णा साखरे, मल्हार साखरे, भाग्यश्री साखरे, शिवानंद साखरे, भिमराव पाथरूट, रेखा ओहोळ, विठ्ठल होरडे, संजय म्हमाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन तसेच सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी केले.