Type Here to Get Search Results !

सोलापूर नगर राजभाषा कार्यान्वयन समितीची पार पडली सहामाही बैठक

हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसार व प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा

सोलापूर : जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या कार्यालयात राजभाषा हिंदीच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या वतीने सूर्या एक्झिक्युटिव्हच्या लिलका सभागृहामध्ये सहामाही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत केंद्रीय कार्यालयांच्या राजभाषा अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळात हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसार व प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाचे सहाय्यक संचालक राजेंद्र प्रसाद वर्मा, नराकास अध्यक्ष संजीव कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, एनटीपीसी चे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार बंदोपाध्याय आणि सदस्य सचिव विनय प्रसाद साव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

नीरज कुमार दोहारे म्हणाले की, रेल्वेच्या विविध विभागांमध्ये हिंदी भाषेचा वापर आणि प्रसार सातत्याने वाढत आहे आणि राजभाषा हिंदीमध्ये चांगले काम सुरू आहे.  

तपन कुमार बंदोपाध्याय यांनी एनटीपीसी मधील विविध विभागांमध्ये हिंदी भाषेविषयी होत असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली.

राजेंद्र प्रसाद वर्मा यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी कशा पद्धतीने उपयोगात आणावे याविषयी विस्तृत माहिती दिली.

वर्ष 2023-24 या कालावधीमध्ये नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या वतीने सरकारी कामकाजात हिंदीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी विविध स्पर्धेच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यात येत आहे, असे संजीव कुमार यांनी सांगितले.

2023-24 या वर्षात राजभाषा हिंदी मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मध्य रेल्वे सोलापूर विभाग, पीएम श्री केंद्रीय विद्यालय, एनटीपीसी लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भीमा उपमंडळ केंद्रीय जल आयोग, केंद्रीय संचार ब्यूरो, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा महामंडळ, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, आकाशवाणी केंद्र, राष्ट्रीय डाळिंब अनुसंशोधन केंद्र या केंद्रीय कार्यालय यांना राजभाषा शील्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

14 सप्टेंबर हिंदी दिन आणि हिंदी पंधरवडा निमित्त केंद्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन पारिभाषिक शब्दावली, हिंदी टिपणी व प्रारूप लेखन, वक्तृत्व आणि निबंध लेखन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास यादव यांनी केले आणि आभार दिलीप कुमार यादव यांनी मानले. बैठकीचे प्रास्ताविक सदस्य सचिव विनय प्रसाद साव यांनी केले.

या बैठकीला शहरांतील 30 पेक्षा अधिक केंद्रीय कार्यालय आणि बँकेचे विभाग प्रमुख, राजभाषा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.