उत्तर सोलापूर : तालुक्यातील होनसळ येथील डी. एम. प्री प्रायमरी व दिलीपराव माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधान दिन गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारताचे संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. तसेच निबंध लेखन चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रम प्रसंगी धर्मदेव शिंदे, उमेश जगताप, सचिन नाईकनवरे, अशपाक अत्तार, अक्तर सय्यद, सुधाकर पवार, विकी माने, सुप्रिया पवार, शिल्पा उबाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अस्फिया पटेल तर स्नेहल साबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.