सोलापूर : २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली संविधान गौरव शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. संविधानाबद्दल जनजागृती करण्यासाठी या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं.
सोलापूर शहरातील जैन गुरुकुल प्रशाला आणि माढा तालुक्यातील मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव या दोन केंद्रावर ही परीक्षा संपन्न झाली. सोलापूर शहरासह सांगोला, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी बुद्धजय भालशंकर, आशुतोष तोंडसे, सत्यवान पाचकुडवे, विनोद वर, विश्रांती बनसोडे यांनी परिश्रम घेतले.