सोलापूर : साथीदारासह खंडणी मागणे, सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या रणजित विलास वाघमारे (वय-३६ वर्षे) याला सोमवारी, ४ नोव्हेंबर रोजी सोलापूर पोलीस आयुक्तालयानं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार केलंय.
सोलापुरातील आमराई परिसर देशमुख पाटील वस्ती येथील रहिवाशी असलेल्या रणजित वाघमारे याच्याविरुध्द २०१९ व २०२४ या कालावधीमध्ये साथीदारासह खंडणी मागणे, सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांनी कार्यवाही करुन रणजित वाघमारे याला २ जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केलंय. त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.