अंमळनेर : शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा विविध गुणांचा आदर्श घेत राष्ट्रासाठी,शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपले योगदान देत असल्याप्रित्यर्थ डॉ. किरण काळे यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालय अंमळनेर येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई आणि ऑल इंडिया राईट असोसिएशन,नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आज "शास्वत आणि सर्वसामावेशक शहरी विकास आणि सामाजिक चळवळ" या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय परिषदेत डॉ. किरण काळे यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी श्याम पवार, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद संचालक सुनील गरुड, प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, ऑल इंडिया ह्यूमन राईट असोसिएशनचे प्रमोद पाटील, प्रा. डॉ. युवराज मानकर, प्रा. डॉ. किरण काळे मॅडम, प्रा. सुनील वाघमारे उपस्थित होते.
या परिषदेत संशोधक, प्राध्यापक आणि सर्व विषयांचे अभ्यासक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.