Type Here to Get Search Results !

समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा


सोलापूर : 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन' निमित्ताने  सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चौक, सोलापूर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ,संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन व संविधान अमृत महोत्सव वर्ष 2024-25 ‘‘घर घर संविधान ’’ अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संविधानाबाबत शाहीर सुरेश खाडे यांनी पोवाडा गायन करून, विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त (सोलापूर महानगरपालिका) संदीप कारंजे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे,  इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक श्रीमती मनिषा फुले, शासकीय वसतीगृहाचे गृहपाल व विद्यार्थी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय, विविध आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी व कर्मचारी, तालुका समन्वयक तसेच समतादूत व मान्यवर उपस्थित होते.अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली.