सोलापूर : ईव्हीएम पध्दतीमुळे लोकशाही आणि पर्यायाने देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आलं असल्याची जनभावना आहे. त्यामुळं ईव्हीएम विरोधात निर्णायक भूमिका घेणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यासाठी लोकशाहीवादी नागरिक, संस्था, संघटना, पक्ष यांची मोट बांधली जात आहे. त्याचाच भाग म्हणून ईव्हीएम विरोधी कृती समिती शहर व जिल्हा सोलापूर ची रविवारी, ०१ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५:३० वा. सोलापुरातील शासकीय विश्रामधामात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम कुमार नवघरे यांनी दिलीय.
संविधानावर आधारित राष्ट्रवाद आणि लोकशाही जतन करण्यासाठी तमाम देशभक्तांना आवाहन करण्यात येत आहे की, भारतीय नागरिकांची मुस्कटदाबी करणार्या, मतदारांच्या मतांची चोरी करणार्या, त्यांच्या मुलभूत अधिकारावर घाला घालणाऱ्या ईव्हीएम नामक बनावटी व सदोष निवडणूक प्रक्रिया बंद करण्याचा निर्धार लोकशाहीवादी जनतेने केला आहे. 'ईव्हीएम हटाव कृती समितीही 'एल्गार' पुकारत सक्रिय बनली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अहवाल, आकडेवारीतील तफावत, वृत्तपत्रातून-सोशल मिडियामधून समोर आलेला तपशील, तज्ञांचे निष्कर्ष यामुळे सर्वत्र हलकल्लोळ माजला आहे. ईव्हीएम पध्दतीमुळे लोकशाही आणि पर्यायाने देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आलंय.
संविधानावर आधारित राष्ट्रवाद आणि लोकशाही जतन करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. देशातील नागरिकांची मुस्कटदाबी करणार्या, मतदारांच्या मतांची चोरी करणार्या, त्यांच्या मुलभूत अधिकारावर घाला घालणाऱ्या ईव्हीएम नामक बनावटी व सदोष निवडणूक प्रक्रिया बंद करण्याचा निर्धार लोकशाहीवादी जनता करीत आहे. त्यातूनच 'ईव्हीएम हटाव कृती समितीही 'एल्गार' पुकारत सक्रिय बनली असल्याचे उत्तम कुमार नवघरे यांनी म्हटलंय.
त्यासाठी लोकशाहीवादी नागरिक, संस्था, संघटना, पक्ष यांची मोट बांधली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून व पुढील दिशा ठरवण्यासाठी या व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. उत्तम कुमार नवघरे, हसिब नदाफ, जगदीश कलकेरी, राम गायकवाड, मकरंद माने, शफिक काझी, अॅड. गोविंद पाटील, डाॅ. अस्मिता बालगांवकर, विद्या माने, समीउल्लाह शेख, नाना प्रक्षाळे, शेखर बंगाळे, अॅड. आकाश इंगळे, किरण पारवे, अॅड. प्रशिक नवघरे, प्रवीण चाफाकरंडे, आशुतोष बाबरे यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केलंय.