Type Here to Get Search Results !

महायुतीने आमदार चंद्रकांत सोनवणे यांना द्यावं आदीवासी मंत्रीपद : गणेश अंकुशराव

पंढरपूर : आदिवासी कोळी जमातीचे राज्याचे नेते,  आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातीचे नेते, शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांना आदिवासी विकास मंत्री पद देण्यात यावं, अशी मागणी पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केलीय.

गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी कोळी जमातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्र प्रश्न, पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटातील आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे स्मारकाचा प्रश्न यासारखे अनेक प्रश्न जैसे थे, आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व आदिवासी कोळी जमातीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी समाजाच्या नेत्याला आदिवासी मंत्रीपद मिळणं गरजेचं आहे, अशी समाज भावना आहे.

आमदार चंद्रकांत सोनवणे हे मंत्री झाले तर आम्हाला हक्काचा विश्वासू मंत्री मिळणार आहे. तरी महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी राज्यातील बहुसंख्य असलेल्या कोळी जमातीच्या भावना व पाठिंबा लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत सोनवणे यांना आदीवासी मंत्री पद द्यावं, अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केलीय.