Type Here to Get Search Results !

‘जर्नी’ तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित !


चिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे प्रेरणादायी गीत जीवनाचा प्रवास आणि आत्मशोधावर आधारित असून, जावेद अली यांचा सुमधुर आवाज गाण्याला लाभला आहे. गाण्याचे बोल विशाल कांबळे आणि गजानन मापारी यांनी लिहिले असून, संगीत विशाल कांबळे यांनी दिले आहे.

या शीर्षक गीतात जीवनातील संघर्ष, नात्यांचा गुंता, आणि स्वत्वाचा शोध यांचा सुंदर संगम आहे. या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना जीवनाचा आशय आणि नात्यांचे महत्त्व जाणवेल.

दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे म्हणतात, “ हे शीर्षक गीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देणारे आहे. गाण्याच्या प्रत्येक ओळीतून जीवनाचा आशय उमटतो. या चित्रपटातील प्रवास हा केवळ एका मुलाचा नसून, त्याच्या पालकांचा, त्यांच्या नात्यांचा आणि सगळ्यांच्या अनुभवांचा आहे.”

सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, निखिल राठोड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सचिन दाभाडे यांची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे लेखन रविंद्र मठाधिकारी यांनी केले आहे तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.