लायन्स क्लब ऑफ सोलापूरतर्फे दिलीपराव माने विद्यालयास ग्रीन बोर्ड प्रदान
उत्तर सोलापूर : ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांच्या मुला-मुलींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशालेस भौतिक सुविधांची गरज आहे. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्या गरजा पूर्ण करण्यात येतील, असं प्रतिपादन लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनेश बिराजदार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने शिक्षण संकुलनामध्ये लायन्स क्लब ऑफ सोलापूर तर्फे कै. सौ. जयश्री विष्णुदास परांडकर यांच्या स्मरणार्थ दिलीपराव माने विद्यालयास ग्रीन बोर्ड प्रदान कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आश्रयदाता अभिजीत परांडकर होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पंचायत समितीच्या माजी सभापती रजनी भडकुंबे यांच्या हस्ते ग्रीन बोर्डाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी दिनेश बिराजदार बोलत होते.
वितरण कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी उपसभापती संभाजीराव भडकुंबे, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनेश बिराजदार, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब कोथली, रमेश जैन, श्रीकांत सोनी, संगमेश्वर रघोजी, राजेंद्र कासवा, शहा शेठ, बसवराज बिराजदार, पशुपती माशाळ, पद्मजा कुलकर्णी, मंजुनाथ दर्गोपाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश जगताप, सूत्रसंचालन सचिन नाईकनवरे यांनी केले, तर आशपाक आत्तार यांनी सर्व उपस्थितांचे मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.