सोलापूर : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे विभाग यांच्या वतीने सोलापूर येथील क्रिडा संकुल येथे दिनांक ०८, ०९ ऑक्टोबर रोजी झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये तलवारबाजी (ईपी) या प्रकारात व सायबर या प्रकारात 19 वर्षीय मुलीच्या गटामध्ये विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथील श्रावणी दीपक शिंदे हिने द्वितीय क्रमांक (ईपी) व सायबर प्रकारात तृतिय क्रमांक पटकावत गरुड झेप घेतली, हे यश खेचून आणल्यामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालीय.
विभागीय मैदानी स्पर्धेसाठी आकांक्षा शिंदे ची निवड : महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय मैदानी स्पर्धा व युवक संचालनालय, पुणे विभाग यांच्या वतीने एस. आर. पी. कॅम्प, सोलापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोळा फेक मैदानी स्पर्धेमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, कोंडी येथील आकांक्षा अनिल शिंदे या विद्यार्थिनीने 8.96 मिटर गोळा फेकून 17 वयोगटातून जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. तिची विभागीय गोळा फेक या स्पर्धेसाठी निवड झालीय.
तसेच अविष्कार प्रसेनजित काटे या विद्यार्थ्यांचा योगासन स्पर्धेमध्ये विभागात चौदावा क्रमांक मिळवला. या निवडीबद्दल शाळेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ, प्राचार्या सुषमा नीळ, प्रा. वैभव मसलकर व क्रीडा शिक्षक दिलीप भोसले यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.