Type Here to Get Search Results !

दुःखद आणि धक्कादायक ! प्रसिद्ध वकील व्ही. डी. फताटे यांचे निधन


सोलापूर : येथील प्रसिद्ध वकील विश्वनाथ धानप्पा फताटे यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी, ०४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांचं अंतिम दर्शनासाठी सोलापूर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. नंतर त्यांच्या मूळगांवी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गांवी सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनावर अनेकांनी एक मार्गदर्शक अन् दिलखुलास मनाचा सच्चा मित्र काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय. 

''ज्येष्ठ विधीज्ञ विश्वनाथ धानप्पा, व्ही. डी. फताटे सर्वदूर परिचीत होते. ते चांगले आणि दिलखुलास मित्र होते. दरवर्षी जानेवारी महिन्यात सर्व पत्रकार मित्रांना तीर्थ गावातील आपल्या शेतात प्रेमाने बोलावून हुरडा पार्टी द्यायचे. दरवर्षी दिवाळीला स्वतःच्या घरी आग्रहाने फराळासाठी आग्रहाने आमंत्रित करायचे. 

एखाद्या विषयावर गप्पा मारताना खास शैलीत किस्से सांगायचे. संपर्कातील काही राजकीय नेते, त्यावेळच्या नामचीन गुंडांविषयीच्या गोष्टी सांगताना फताटे वकिलांच्या मनाचा कप्पा नेहमीच खुला असायचा. ते कोणतीही गोष्ट झाकून ठेवत नसत. अगदी एखादी नाजूक खासगी बाब सुध्दा उघड करायचे. 

न्यायालय परिसरात त्यांच्या चेंबरमध्ये भेटणे नेहमीच आनंदाचा भाग असायचा. ती मैफल असायची. गेली ३५-३७ वर्षे फताटे वकिलांशी निखळ मैत्री होती. त्यांच्या आठवणी मनात सतत कायम राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली'' या शब्दात दैनिक लोकसत्ता चे प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय.

'एका प्रेमळ व चांगल्या वकिलाची एक्झिट... ' या शब्दात ज्येष्ठ विधिज्ञ विश्वनाथ फताटे यांना दैनिक संचार चे प्रतिनिधी अनिल कदम यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलीय.

मराठा व्हिजन चे विशाल भांगे यांनीही ज्येष्ठ विधिज्ञ विश्वनाथ फताटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली केलीय.