सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले. ते प्राकृतिक अस्वास्थामुळे तर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मुंबई येथे असल्याने या कार्यक्रमास येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्य आणि केंद्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या महत्वाकांक्षी योजनांची व निर्णयांची सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यास संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील अशी ग्वाही दिली.
माजी खासदार डॉ. जय सिध्देश्वर स्वामी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे पाटील, शिवाजी सावंत, महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले-तेली, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, ज्योती वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.