Type Here to Get Search Results !

नेत्र चिकित्सा शिबीरात नागरिकांसाठी लोकशाही फाऊंडेशनची मोलाची मदत : रियाज हुंडेकरी


सोलापूर : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजवंत नागरिकांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर घेणाऱ्या आयोजकांना लोकशाही फाऊंडेशनचे संस्थापक वसीमराजा बागवान मोफत चष्म्याची फ्रेम व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी ही सेवा देऊन गरजूंना मोलाची मदत करत असतात, असं प्रतिपादन माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी यांनी केले. 

येथील कुर्बान हुसेन नगर भागात लोकशाही फाऊंडेशन व कुर्बान हुसेन अरबी मदरसा-मकतब यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी व मोफत चष्म्याची फ्रेमसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


शिबीराच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, पोलीस फिरोज शेख, कम्युनिस्ट पक्षाच्या नलिनी कलबुर्गी, पत्रकार सुरक्षा समितीचे यशवंत पवार, अॅडवोकेट मुबीन बागवान, लोकप्रधान न्युजचे वजाहत शेख, बॉडी बिल्डर विजेतेपद पटकावलेले अकबर कुरेशी, लोकशाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसिमराजा बागवान हे उपस्थित होते. याप्रसंगी माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी बोलत होते. 

सर्व प्रमुख पाहुण्यांना मदरशातील विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते बॉडी बिल्डर स्पर्धेत सोलापूर " गणराज श्री" विजेतेपद पटकावलेले अकबर कुरेशी व लोकशाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसिमराजा बागवान यांचा शाल-पुष्पहार तसेच सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी बोलत होते. 


या शिबीरामध्ये २०० गरजूंनी सहभाग घेतला होता. कुर्बान हुसेन नगर मदरसा यांच्या वतीने मंडप लाऊन बसण्यासाठी खुर्ची, पाण्याची सोय करण्यात आली होती.

यावेळी कुर्बान हुसेन मदरसा-मकतब चे अध्यक्ष आरीफ पठाण, ऑप्टोमेट्रीस्ट गौस मुजावर, सादिक बेग, जावेद सगरी, सलिम पटेल, इम्रान नदाफ, अब्दुल शेख, सलिम मोमिन, नासिर दफेदार, अरबाज नदाफ, आदमी शेतसंदी आदी पदाधिकारी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.