सोलापूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या पुरस्कारात शैक्षणिक पटलावर सन्मानाचं प्रतिक म्हणून गणला जाणारा राज्यस्तरीय उपक्रमशील शाळा पुरस्कार दिलीपराव माने विद्यालयास नुकताच प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटने मोहोळ येथील घाटुळे मंगल कार्यालयात 02 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण वितरण सोहळ्यात संघटनेचे राज्य अध्यक्ष शामराव जवंजाळ यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी उपसभापती संभाजी भडकुंबे संस्थेच्या संचालिका व माजी सभापती रजनी भडकुंबे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, संस्थेचे सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी पुरस्कार वितरणप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, धर्मदेव शिंदे, उमेश जगताप, सचिन नाईकनवरे, विकी माने सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.