सोलापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ची आचारसंहिता असल्याने या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यात दरमहा पहिल्या सोमवारी होणारा जिल्हा लोकशाही दिन (माहे नोव्हेंबर 2024) मध्ये आयोजित केला जाणार नाही, असं निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविलं आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम घोषित झाल्याने निवडणुक कार्यक्रमानुसार राज्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणुकांची आचार संहिता दि. 15 ऑक्टोबर 2024 ते 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत असल्याने शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक अन्वये आचार संहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करु नये, असे अतिरिक्त मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील 15 ऑक्टोबर 2024 च्या पत्रात नमूद केलेले आहे, असंही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.