श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ, रोटरी कॉप्स परिवार, सोलापूर आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, पुणे यांचा संयुक्त उपक्रम
मोफत नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीराचा ८०० हून अधिक गरजू रुग्णांना लाभ
कायमस्वरूपी मोफत नेत्र तपासणी केंद्र सुरु
सोलापूर : मोफत नेत्र चिकित्सा, भिंगारोपण शस्त्रक्रिया उपक्रमाच्या आयोजनासाठी गुजराती मित्र मंडळ व रोटरी कॉप्स परिवाराचे आभार मानत अशा प्रकारचे उपक्रम सुरू करून समाजातील गरजू रुग्णांना मोलाची मदत केली असल्याचे प्रतिपादन डॉ. कुलदीप डोळे यांनी आपल्या समायोचित भाषणात केले.
येथील श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ, रोटरी कॉप्स परिवार, सोलापूर व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्ममाने मोफत मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन शिबीर रविवारी १९ ऑक्टोब रोजी सकाळी ९ ते दु. २ दरम्यान गुजरात भवन येथे घेण्यात आले होते. एच. आय. हॉस्पिटल, पुण्याचे मेडिकल डायरेक्टर डॉ. कुलदीप डोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुजराती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुकेश मेहता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
ह्याप्रसंगी त्यांचा हस्ते गुजराती मित्र मंडळ च्या परिसरात नव्याने स्थापन कायमस्वरूपी नेत्र तपासणी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. ह्या सेंटरद्वारे गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून आवश्यक रुग्णांना मोगल शस्त्रक्रिया हि करण्यात येणार आहे. ह्या शस्त्रक्रिया पुण्याच्या एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय येथे करण्यात येतील व जाण्या-येण्याची सोयही रुग्णालय करणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. या शिबीरात गरजू रुग्णांना चष्माचा नंबर आल्यास चष्मा ही मोफत देण्यात आला.
प्रारंभी उपाध्यक्ष मणिकांत दंड यांनी स्वागत केले तर सचिव जयेश पटेल यांनी प्रास्ताविक केले. हे संपूर्णतः नि:शुल्क असणार असल्याचे दवाखाना कमिटी चेअरमन भरत शाह यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव संदीप जव्हेरी यांनी केले. शेवटी रोटरी कॉप्स परिवारचे अध्यक्ष रोटे. अविनाश मठपती यांनी आभार प्रदर्शन केलं.
मंचावर रोटरी कॉप्स परिवाराचे उपाध्यक्ष अंबादास गड्डम उपस्थित होते. कार्यक्रमास गुजराती मित्र मंडळ, महिला मंडळ, युवा फोरमसह शहरातील सर्व रोटरी क्लब चे सुनील माहेश्वरी, सचिन तोष्णीवाल, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी नेत्र तपासणी केंद्राचे ऑप्टोमेट्रीस्ट सागर पवार, गौस मुजावर, मंजिरी पाटील, ध्रुव ज्योती, अनंत क्षीरसागर यांच्यासह व्यवस्थापक प्रसाद ताटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. पंकज शाह व डॉ. दर्शना शाह यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
ह्या शिबिरात ८०० हून अधिक नेत्ररुग्णांची चिकित्सा करण्यात आली. त्यात सुमारे २०० रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे, त्या सर्वांना पुणे येथे पुढील १० दिवसात घेऊन जाऊन परत आणण्याची संपूर्ण सोय नि:शुल्क करण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव जयेश पटेल यांनी यावेळी दिली.
फोटो ओळी : नेत्र शिबिराचे उद्घाटनप्रसंगी द्वीप प्रज्वलन करताना प्रमुख पाहुणे डॉ. कुलदीप डोळे यांच्यासह डावीकडून रोटरी कॉप्स सोलापूर परिवाराचे उपाध्यक्ष अंबादास गड्डम, अध्यक्ष अविनाश मठपती, उपाध्यक्ष मणिकांत दंड, अध्यक्ष मुकेश मेहता, डॉ.अतुल हेगडे,सचिव जयेश पटेल, दवाखाना कमिटी चेअरमन भरत शाह छायाचित्रात दिसत आहेत.