सोलापूर : वीजांच्या गडगडासह पावसात वीज कोसळल्यानं मंदिराचं नुकसान झालंय. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे गंगेवाडी इथं रविवारी दुपारी दीड वा. च्या सुमारास घडलीय. या दुर्घटनेत सुदैवानं जीवीत हानी झालेली नाही, मात्र मंदिराचं शिखरावरील मूर्ती, खांब आणि इलेक्ट्रीकला झळ वायरींगचं नुकसान झालंय.
याबाबत मिळालेली अधिक सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरचं गांव अशी छोट्याशा गंगेवाडी गांवची ओळख आहे. गंगेवाडी पंचक्रोशीत गेले २-३ दिवस ढगाळ वातावरण असून गेले २ दिवस सायंकाळी वीजांचा कडकडाटासह रिमझीम पाऊस आला.
आज रविवारी दुपारी वीजांचा कडकडाटासह पाऊस आला. या पावसात ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरावर वीज कोसळल्यानं मंदिराच्या शिखरावर कोरलेल्या मुर्तींचं काही प्रमाणात नुकसान झालंय. या दुर्घटनेत मंदिराचा खांबाला तडे गेल्याचं दिसतंय तर इलेक्ट्रीक वायरींगचही नुकसान झालंय, सुदैवानं कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.