Type Here to Get Search Results !

श्री रुपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ अध्यक्षपदी मल्लिनाथ लातुरे तर उपाध्यक्षपदी संताजी भोळे


सोलापूर : येथील ग्रामदेवी श्री रुपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाची सर्वसाधारण सभा मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली. या सभेत अध्यक्षपदी मल्लिनाथ लातुरे आणि उपाध्यक्षपदी संताजी भोळे यांच्यासह गतवर्षाची कार्यकारिणी पुनश्च निवड करण्यात आली.

या सभेत प्रारंभी मागील आर्थिक वर्षाचा जमाखर्च, हिशोब, इतिवृत्तांत नागनाथ कोळेकर यांनी मांडले. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण सभेत प्रामुख्यांने भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची दक्षता, मंदिर परिसर स्वच्छता, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे या सभेत ठरले.

2024-25 पदाधिकारी हे मागील वर्षाचे असून यात अध्यक्षपदी मल्लिनाथ लातुरे,उपाध्यक्ष, संताजी भोळे, यांची पुनश्च निवड करण्यात आली. खजिनदार प्रमोद पवार, सचिव जगदेव बंडगर, सदस्य प्रविण कोनाळी, अरुण लातुरे आदींची सर्वानुमते निवड  करण्यात आली.

याप्रसंगी तम्मा कोनाळी, रोहन लातूरे, पिंटू अक्कलकोटे, संजय पवार, राजू पवार, सूरज पाटील, रेवण पागाद, स्वप्नील पवार, ॲड. चिवरी यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.