सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे शनिवारी, 28 सप्टेंबर रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकन्यायालयामध्ये प्रामुख्याने सोलापूर महानगरपालिकेचे मिळकत कर तसेच भूमी व मालमत्ता विभागाची प्रकरणे ठेवण्यात आली आहे. या लोक न्यायालयामध्ये सोलापूर महानगरपालिकेकडून थकीत मिळकत करावरील दंड/शास्ती यामध्ये 50 टक्के पर्यंत सुट देण्यात येणार आहे.
नागरिकांच्या सोईसाठी मिळकत कर, भूमी व मालमत्ता विभागाशी संबंधीत प्रकरणासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सवलतीचा फायदा नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.