सोलापूर : मानवतेची सेवा आणि सामाजिक सौहार्द वाढविण्याचे ध्येय बाळगणारी जॉईन फॉर पिस ही एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेच्या यंदाच्या जे.पी. शांतता पुरस्काराचे माजी आमदार दिलीपराव माने, कामगार नेता कॉ. एम.एच. शेख, ज्येष्ठ विचारवंत दत्तात्रय थोरे आणि डॉ. प्रदीप छंचुरे पुरस्काराचे मानकरी आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा जागतिक शांतता दिनी शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी अॅम्फी थिएटर ( ४ हुतात्मा चौक) मध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेने एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिलीय.
या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे आणि शांतता, समता, व मानवाधिकारांची जपणूक करणे आहे. जॉईन फॉर पीस संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होवून शांतता व बंधूभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे.
याचाच एक भाग म्हणून २१ सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता बंधूता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता, सामाजिक ऐक्य, शांतता व राष्ट्रीय एकत्मता जोपासण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना मागील ०५ वर्षापासून "JP शांतता पुरस्कार " ने सन्मानित करण्यात येत आहे.
जे.पी. शांतता पुरस्कार-२०२४ चे मानकरी म्हणून माजी आमदार दिलीपराव माने, कामगार नेता कॉ. एम. एच. शेख, ज्येष्ठ विचारवंत दत्तात्रय थोरे आणि रूग्णसेवेसाठी डॉ. प्रदीप छंचुरे यांची निवड झालीय.
सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. जेपी शांतता पुरस्कारासाठी निवड झालेल्या या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांना तसेच नागरिकांना निमंत्रित करण्यात आलं असल्याचं अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला आणि सचिव प्रा. जैनुद्दीन पटेल यांनी म्हटलंय.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी शनिवारी, २१ सप्टेंबर २०२४ रोजी संध्या. ५.३० वा. अॅम्फीथिएटर-लोकमान्य टिळक सभागृह, हिराचंद नेमचंद लायब्ररी येथे हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिलीय.
या पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.