Type Here to Get Search Results !

लाभार्थ्यांची बँकेविषयी तक्रार असल्यास हेल्पलाइन क्रमांकावर साधावा संपर्क : जिल्हाधिकारी


बँकांनी लाडकी बहिण योजनेचे पैसे कपात केले असतील तर ते संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर येतील परत

 सोलापूर : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १४ ऑगस्ट २०२४ पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही बँकांकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे विविध कारणास्तव परस्पर कपात केले जात आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांना संबंधित लाभार्थ्याचे बँक खात्यावरील पैसे कपात करू नये, याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लाभार्थ्यांचे बँक खात्यातून पैसे कपात झाले असतील तसेच या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुका निहाय हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुका निहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून हेल्पलाईन क्रमांक खालील प्रमाणे देण्यात येत आहेत....

माढा - संरक्षण अधिकारी श्रीमती उज्वला कापसे मो.नं. 8308273114, 

विस्तार अधिकारी बंडु खेताडे मो.नं.7030384711, विस्तार अधिकारी आकाश कोकाटे मो.नं. 7030384711

बार्शी - विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले मो.नं.8208213921, 

विस्तार अधिकारी सुरज काटकर मो.नं. 8208213921

उत्तर सोलापूर- संरक्षण अधिकारी अविनाश जेठीयार मो.नं. 8698475808, 

विस्तार अधिकारी रवि पाटील मो.नं.7588046259

मोहोळ – संरक्षण अधिकारी उज्वला कापसे मो.नं.8308273114, 

विस्तार अधिकारी शिलादेवी दाढे मो. नं. 9975567732

सांगोला- संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण मो.नं.7875693241,

विस्तार अधिकारी प्रविण गायकवाड मो.नं.8421910928,

करमाळा – संरक्षण अधिकारी मिथुन पवार मो.नं. 9527341147, 

विस्तार अधिकारी संदिप रणदिवे मो.नं.7387294383

माळशिरस – संरक्षण अधिकारी श्रीमती पी. एस. वावरे मो. नं. 8788158230, 

विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे मो.नं.9637983739

पंढरपूर  - विस्तार अधिकारी अनंत शिंदे मो.नं.9049529797, 

विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार मो.नं.8275303173

दक्षिण सोलापूर – विस्तार अधिकारी ऋषीकेश जाधव मो.नं.8600798899, 

संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे मो.नं.9049113282

अक्कलकोट – विस्तार अधिकारी मृणाली शिंदे मो.नं.9420358355, 

संरक्षण अधिकारी एस.एस.कलशेट्टी मो.नं.9665673745

मंगळवेढा – पर्यवेशिका श्रीमती अनुराधा शिंदे मो.नं.9423591049, 

संरक्षण अधिकारी आर.आय.विजापूर मो.नं.9326527044.

तरी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर उपरोक्त संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.