सोलापूर : आपल्याजवळील एखादी वस्तू गहाळ झाली तर प्रत्येक जण अस्वस्थ होतो. जेव्हा गर्दीत पोटचा गोळा हरवितो, त्यावेळी जन्मदात्यांची काय अवस्था होऊ शकते, याची कल्पना सुध्दा मनाला चटका लाऊन जाते. अशाच संकटात सापडलेल्या माता-पित्यास त्यांच्या काळजाचा तुकडा शोधून देण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने मोलाची मदत केलीय. या प्रयत्नाबद्दल त्या माय-बापानं गृह मंत्रालयाचं आभार मानलंय.
सोलापुरातील भगवाननगर येथे राहणारे किरण भरतनूर आणि पत्नी अर्चना हे दाम्पत्य, त्यांच्या लहानग्या ०५ वर्षीय नवल समवेत शिर्डी इथं साईबाबांच्या दर्शनास गेले होते. ते बाबांचं दर्शन आटोपून मंदिरातूनन बाहेर असताना, ०५ वर्षीय नवल गर्दीत हरवला, असे प्रसंग चित्रपटात सर्रास दिसतात.
गोसकी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात रामेश्वर भाऊ नाईक यांच्याशी संपर्क साधून सोलापुरातील पाच वर्षाचा बाळ हरविल्याचे सांगितले. आरोग्यदूत रामेश्वर भाऊ नाईक यांनी तात्काळ शिर्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना संपर्क साधून फोन वरूनच प्राथमिक खबर नोंद करून घेण्यास पोलिसांना सूचना केल्या. त्यावेळी पोलिसांनीही त्यास प्रतिसाद देत सर्व माहिती बाळाचे फोटो घेण्यात आले.
सलग दोन दिवसाच्या अथक प्रयत्नातून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी सतत संपर्कात राहून आनंद गोसकी यांनी फॉलोअप घेतच होते. पोलिसांच्या व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यालयाच्या मदतीने शुक्रवारी, नवल आईच्या कुशीत विसावला. त्याच्या माता-पित्यानं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करताना, आपलं सहकार्य आयुष्यभर विसरणार येणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.