सोलापूर : सलग सात तास सात मिनिट सात सेकंद दांडपट्टा चालविण्याचा विश्वविक्रम केलेल्या क्षात्रविर कृष्णा पवार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सोलापूरचा दृष्टीने ही गौरवशाली बाब असून दांडपट्टा हे राज्यशस्त्र म्हणून राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली होती. दांडपट्ट्याचा प्रचार प्रसार व्हावा, म्हणून क्षात्र वीर कृष्णा पवार यांनी सोलापूरमध्ये सलग सात तास दांडपट्टा फिरण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते क्षात्रविर कृष्णात माने यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, शहराध्यक्ष शिरिष जगदाळे, जिल्हा संपर्कप्रमुख छात्रगुण माने, कृष्णात पवार, सुधाकर कोरे, मनोज गंगणे आदी उपस्थित होते.