Type Here to Get Search Results !

एम. ए. पानगल प्रशालेस व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद


सोलापूर : हिंदुस्तानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल च्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात एम.ए.पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने विजेतेपद पटकाविले.

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून पानगलच्या व्हॉलीबॉल खेळाडूंनी आपल्या खेळाची पक्कड मजबूत ठेवली, तसेच सामने जिंकून पुढील चाल कायम ठेवली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पानगल प्रशालेची स्वामी विवेकानंद प्रशालेशी गाठ पडली. 

या अटीतटीच्या सामन्यात एम. ए. पानगल प्रशालेने स्वामी विवेकानंद प्रशालेस २-० ने मात करीत अंतिम सामना जिंकला. व्हॉलीबॉल स्पर्धेत कामरान दलाल व काझीम इनामदार या दोन खेळाडूंना उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

व्हॉलीबॉल विजय संघात दलाल कामरान, पटेल मोहम्मद जुनेद, हन्नुरे अबु जेद, काझिम इनामदार, कुमटे मोहम्मद साद, पटेल मुजम्मिल, कलादगी मुस्तकीम, सिद्दिकी मोहम्मद मुजताबा, पटेल फरहान, बागबान अब्दुल रहमान, बागबान सफवान, इनामदार कासिब होते.

या यशाबद्दल प्राचार्य डॉ. हरून रशीद बागबान, उपमुख्याध्यापिका डॉ. सुरय्या परविन जहागीरदार, निकहत  नलामंदू, जाकीर शहापुरे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी आदींनी खेळाडूंचं अभिनंदन केले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक अल्ताफ सिद्दिकी, नावेद मुनशी आणि इकबाल दलाल सर यांचे मार्गदर्शन लाभले.