Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन



सोलापूर जिल्ह्यातील 27 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्धाटन

जिल्ह्यातील 27 महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांची ऑनलाइन उद्घाटन समारंभास उपस्थिती

एसएसएसएम डिप्लोमा इन आर्किटेक्चर सोलापूर या महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूने यांच्या हस्ते 10 विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, 20 सप्टेंबर रोजी वर्धा येथे स्वावलंबी शाळेच्या प्रांगणात जाहीर सभेद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या लाभार्थ्यांनी मार्गदर्शन व त्यांच्याशी संवाद साधला. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन व यशस्वी महिला स्टार्टअप चा सन्मान सोहळा आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंदांचे ऑनलाईन उद्धाटन करण्यात आले.  यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 27 महाविद्यालयाचा समावेश होता.



या योजनेंतर्गत ऑनलाईन उद्धाटन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.

कौशल्य विकास या संकल्पनेचा जास्तीत-जास्त लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यामध्ये नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टिने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तिवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्रामार्फत 15 ते 45 वर्यागटातील बेरोजगार युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन / वर्च्युअल उद्धाटन करण्यात आले.


त्यामध्ये श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बार्शी, स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी सोलापूर, सी.बी खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंग कॉमर्स ॲण्ड राजा जयसिंह आर्टस कॉलेज अक्कलकोट, भाऊराव पाटील कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्य अनगर, एसएसएसएम डिप्लोमा इन आर्किटेक्चर सोलापूर, एस.एस. गणपतराव महाराज डिग्री कॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस सोलापूर, स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक पंढरपूर, सोजर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट बार्शी, ग्लोबल व्हिलेज आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज बोरामणी, श्री साई आयटीआय सासुरे-वैराग ता.बार्शी, लोकमंगल फाउंडेशन सोलापूर, लोकमंगल ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज आणि लोकमंगल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर, सौ. सुवर्णलता गांधी महाविद्यालय  वैराग, एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च बार्शी, लाटे अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन एखतपूर, सांगोला, लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर ॲण्ड ज्युनिअर कॉलेज माढा, श्रीनाथ विद्यालय ॲण्ड ज्युनिअर कॉलेज माळशिरस, श्री सिध्देश्वर वुमन्स पॉलिटेक्निक या महाविद्यालयांचा समावेश आहे.


एसएसएसएम डिप्लोमा इन आर्किटेक्चर सोलापूर, या महाविद्यालयामध्ये कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर विभाग क्र.1 सदाशिव पडदुणे, सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग हणमंत नलावडे, खादी ग्रामोद्योग अधिकारी बनसोडे, सदर संस्थेचे सहसंचालक असिम सिंदगी, प्राचार्य फयाज शेख, सोलापूर महानगरपालिका कौशल्य विकास विभागाचे समन्वयक समिर मुलाणी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेअंतर्गत 10 विश्वकर्मांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

लोकमंगल फाउंडेशन, सोलापूर या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूरचे विधानसभा सदस्य सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.  लोकमंगल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.


निवड झालेल्‍या महाविद्यालयांचे केंद्र शासनाच्या Skill india digital Hub या वेब पोर्टलवर ट्रेनिंग सेंटरला मान्यता घेण्यात येणार असून प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात साधारण 150 युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 27 महाविद्यालयांमध्ये सोलर एलईडी टेक्नेशियन, डोमेस्टीक डाटा इन्ट्री ऑपरेटर, डेअरी फार्मर/ इंटरप्रेशअर, डेअरी वर्कर, गोट/शीप फार्मर, डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, वेब डेव्हलपर्स, सोशल मीडिया एक्झीक्युटीव्ह, आकौंट असिस्टंट, सर्वेअर, ड्रगस्टमॅन मॅकॅनिकल, ड्राप्ट्सन, सिविल वर्क, सॉप्टवेअर डेव्हलपर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, जनरल ड्युटी असिस्टंट, हेल्थ केअर होस्पीटल फ्रन्ट डेस्क कॉर्डीनेटर अशा प्रकारच्या 52 कोर्सद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींनी या प्रशिक्षण केंद्रामध्ये नोंदणी करून आचार्य चाणक्य कौशल्य व विकास योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग सोलापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.