राष्ट्रवादी युवक संघटना आयोजित अजित दादा चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस उदंड प्रतिसाद
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक संघटनेच्या वतीने भव्य अजितदादा चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २२ संघांनी सहभाग नोंदवून उदंड प्रतिसाद दिला. अंतिम सामन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा चषका मानकरी होण्याचा बहुमान GK बिल्डर संघाने मिळवला तर गणेश जिम संघ उपविजेता ठरला.
या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी गटनेते, सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक D.P.D.C सदस्य किसन जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, मुस्तारे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, कार्यालयीन प्रमुख महेश कुलकर्णी, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरु, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, V.J.N. T. सेल अध्यक्ष रुपेशकुमार भोसले, कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेश सचिव विशाल बंगाळे, शहर संघटक संदीप पाटेकर, दिव्यांग सेल कार्याध्यक्ष M.M. ईटकळे, शहर उत्तर संघटक प्रकाश झाडबुके, शहर उपाध्यक्ष शामराव गांगर्डे सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांची उपस्थिती होती, अजितदादा चषकचे आयोजन दत्तात्रय बडगंची यांनी केले होते. सर्वच मान्यवरांचा सत्कार सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.
या स्पर्धेत G.K बिल्डर संघ विरुद्ध गणेश जिम संघ यांच्यात रोमांचक अंतिम सामना रंगला यामध्ये गणेश जिम संघाने प्रथम ७ ओव्हर मध्ये ७४ रन केले. यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये G.K बिल्डर संघाने विजयासाठी असणारे धावांचे टार्गेट पूर्ण करून गणेश जिम संघावर मात करत ७ व्या षटकात विजयाचा झेंडा लावला.
यानंतर प्रथम विजेत्या G K बिल्डर संघास जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि मान्यवरांच्या हस्ते यंदाचे मानाचे अजित दादा चषक व उपविजेत्या संघास ही ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.या स्पर्धेत एकूण वेगवेगळ्या २२ संघांनी सहभाग घेतला होता.
यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त युवक संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेचे विशेष कौतुक केले. यानंतर अजित दादा चषकाचे यंदाचे मानकरी असणाऱ्या G.k बिल्डर संघाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. यावेळी उपस्थित क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.