उत्तर सोलापूर : तालुक्यातील होनसळ येथील डीएम प्री प्रायमरी व दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेत वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिनेश बिराजदार अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत जोशी (माजी सभापती शिक्षण मंडळ, सोमपा) हे होते. संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे माजी सभापती रजनी भडकुंबे यांनी आपल्या मनोगतात दिलीपराव माने यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशालेचा माजी विद्यार्थी रोहित विजय माने याची पोलीस उपनिरीक्षक PSI पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महिला बालकल्याण विभाग, सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जुडो कराटे प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप मुलींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे, हगलूरच्या उपसरपंच प्रगती भडकुंबे, पाटलोजी जानराव, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश जगताप यांनी केलं तर सूत्रसंचालन तात्यासाहेब तांबे यांनी केले. शेवटी अश्फाक आत्तार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर व शिक्षक वृंद,पालक विद्यार्थी उपस्थित होते.