Type Here to Get Search Results !

भगवा सप्ताह यशस्वी करून शिवसेनेची ताकत वाढवू; सळसळत्या रक्ताच्या तरूणाईला जिल्हाप्रमुखांचं आवाहन


सोलापूर : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या सूचनेनुसार, शनिवारी सायंकाळी दाजी पेठेतील श्री वेंकटेश्वर देवस्थान बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले होते. भगवा सप्ताह यशस्वी करून शिवसेनेची ताकत वाढवूया, शिवसैनिकांच्या सळसळत्या रक्ताच्या तरुणाईला जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी आवाहन केले. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह चे आयोजन आढावा बैठकीत पूर्ण ताकतीने शहरात पक्ष वाढवून विधानसभा, मनपा सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी जय्यत तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती प्रा. अजय दासरी यांनी दिली. 

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. हा भगवा सप्ताह प्रत्येक शाखानिहाय राबविण्यात यावा, असेही प्रा. दासरी यांनी यावेळी म्हटले.

या भगवा सप्ताहामध्ये शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान, शिवसेना पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे सर्व बूथवरील बी.एल.ए. च्या नेमणुका करणे. प्रत्येक शाखेकडून आपापल्या बूथनिहाय नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम राबवणे. प्रत्येक शाखेत पक्षाचे अधिकृत बोर्ड व वार्ता फलक उद्घाटन करणे. बूथनिहाय निवडणूक तयारी करिता पक्षाने आदेशित केलेल्या सर्व सूचना व कार्यक्रम राबवणे हे सर्व उपक्रम पदाधिकारी व शिवसैनिकांची बूथकमिटी तयार करून घ्यावेत. दि.२० ते २६ जुलै दरम्यान राबविलेल्या भगवा सप्ताह कार्यक्रमांचे लेखी अहवाल या बैठकीत सादर करावे, असंही प्रा. दासरी यांनी शिवसैनिकांना सूचित केले.

यावेळी निरंजन बोद्दुल, शशिकांत बिराजदार, अजय खांडेकर, संदीप बेळमकर, शेखर इराबत्ती, नाना मोरे, आबा सावंत, अनिल दंडगुले, दत्ता माने, दत्ता गणेशकर, लहू गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक दत्ता वानकर यांनी केलं तर सुरेश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.